निरागस काळी
Jun 6, 2008
त्या चिमूरडिला पाहता
मन माझे आज हिरमुसले
जगण्याच्या जिद्दा पायी
तिचे बालपणच मालवले
छोट्याश्या त्या सावलिचे
मार्ग का खडतर होता
देवालाहि दया न यावी
असा काय तिचा गुन्हा होता
फुलासारख्या त्या जीवाची
पकली न पकली खुडलेली
आणि कोमालाष्या त्या हातात
फुलाचीच पाटी बहरलेली ..
गाजर्याच्या सुगंधातही
जीव तिचा सुखावलेला
कडाक्याच्या उन्हाताही
मोगर्या सारखा खुललेला
क्षणाची प्रतिमा तिची
मन माझे हिरावून गेली
निरागस हास्य तिचे
असंख्य प्रश्न विनून गेली
नुकत्याच खुललेली ती कळी
फुलन्या आधी विखुरली
सावराया त्या कळी ला
माझी ओंजळ ही कमी पडली ...................
रेश्मा......................
June 6, 2008 at 3:05 AM
देवालाहि दया न यावी
असा काय तिचा गुन्हा होता
फुलासारख्या त्या जीवाची
पकली न पकली खुडलेली
आणि कोमालाष्या त्या हातात
फुलाचीच पाटी बहरलेली ..
mast g
June 8, 2008 at 11:22 PM
thnks da
" Mandal Aabhari Aahe"