!! " श्री गणेशाय नमः "!!

ओळख शब्दाची.....  

Jun 8, 2008


शब्दाची ती ओळख माझी
यावेळी ही पहिलीच आहे
दुनियच्या त्या सुखाशी
भेट माझी पहिलीच आहे .......... .............

लेखणितले सामर्थ्य
आज मी सांधणार आहे
शक्या तितक्या शब्दात
आज मी झुन्जनार आहे ....

खोट्या शपता खोटे मार्ग
आजमवणार आहे
हलक्याश्या श्वासने
सत्य ची बाजू नव्याने मांडणार आहे ....
सुख तेवढे दुख श्रेष्ठ
उगाच उगळुन ही कोळसा आहे
साथ न मिळता शब्दाची
सूर देखील दुबला आहे .............

रेश्मा......................

AddThis Social Bookmark Button


माझ्या चारोळ्या..........  

Jun 6, 2008


उमगे जिवा या न अर्थ कसला
बेभान जाहले कसे सावरू स्वताहाला
तीळ तीळ तुटते मन तुझ्याचसाठी
परी अर्थ ना उमगे तुझ्या खुळ्या मनाला

*************************
सवय झाली मला
तुझ्या शांत असण्याची
आसवे मनात दडवून
शक्य तितक हसण्याची.........
*************************
पानवलेल्या डोळ्यात आज
आश्रू नाही वाट न मिळली
स्पर्शलेल्या त्या सुखाची
कन भर ही साथ न उरली......

************************
क्षणात येती पाखरे
मनी घरटे बांधुनी जाती
उरलेल्या आठवांचे स्वप्न
मात्र उरी ठेऊनी जाती..!!!!!
**************************
श्रावणाच्या जल धारा
कधी मजवरि बरसून गेल्या
मनातले गुपित माझे
हळूच ओठावर ठेऊन गेल्या

**************************
शब्द असे सांडतील मोती
ओंजळ माझी तरी रिती
साथ अशी शब्दांची
का वाटे मज चोरटी..........
**************************
अबोल्याताले जगाने
माझे थोडेसे राहून गेले
थोडेसे शब्द आणि बरसे मौन
यात आयुष्य वाहून गेले ...!!!

****************************
सरले वर्ष आता पुन्हा नवी पहाट
नवीन किराणाचा लेऊन साज ...
नको बंध नकोत नको आश्रू...
नव स्वप्ना ना देऊ नवी वाट.
*****************************
आठावाचा एक आसु
हळूच गालावरून ओघाळला
मुकया भावनेने माझ्या
पापण्यात होता जो अडवलेला


रेश्मा..........

AddThis Social Bookmark Button


निरागस काळी  


त्या चिमूरडिला पाहता
मन माझे आज हिरमुसले
जगण्याच्या जिद्दा पायी
तिचे बालपणच मालवले
छोट्याश्या त्या सावलिचे
मार्ग का खडतर होता
देवालाहि दया न यावी
असा काय तिचा गुन्हा होता
फुलासारख्या त्या जीवाची
पकली न पकली खुडलेली
आणि कोमालाष्या त्या हातात
फुलाचीच पाटी बहरलेली ..
गाजर्‍याच्या सुगंधातही
जीव तिचा सुखावलेला
कडाक्याच्या उन्हाताही
मोगर्‍या सारखा खुललेला
क्षणाची प्रतिमा तिची
मन माझे हिरावून गेली
निरागस हास्य तिचे
असंख्य प्रश्न विनून गेली
नुकत्याच खुललेली ती कळी
फुलन्या आधी विखुरली
सावराया त्या कळी ला
माझी ओंजळ ही कमी पडली ...................

रेश्मा......................

AddThis Social Bookmark Button


माझे मन....  


मनी हसले गाव माझे अन् ,
क्षणात फुलले मन माझे..........
शब्दाविन सजले अन्
वार्यातही झुलले मन माझे..........
क्षण अनेक येती अन्
अनेक येती पावसाले
सुरविण रमले अन्
तालावर धुंधले मन माझे................
चांदण्याच्या अवकाशी
शीतल जल काठी
तुझ्याच सवे निशब्द
रमले मन माझे..........................
आश्रू तही हसले
वादळतही स्थब्दले
तुझ्या आठवणींच्या
सरित भिजले मन माझे.......................
तुझ्या विरहातही
सुरत गायले पण
तुझ्या विन एकटेच
भासले मन माझे.................

रेश्मा......................

AddThis Social Bookmark Button


नवा बहर .....  

जगण्याला माझ्या
अर्थ नवा आला होता
खुनटलेल्या त्या दिशनि
सुर्य नवा पहिला होता......
कोमेजलेल्या त्या क्षणांचा
बहर असा पहिलाच होता
नकळत फुलले कमळ मनाचे
जणू नवा पल्लव फुटला होता
शुभ्र धूक्यात धुन्दलेलि
कोमालशी पहाट होती
सप्त सुराने रंगलेली
संज सावली ही दाट होती
कतरलेल्या त्या क्षणाची
मी ही एक सावली होती
आसवत भिजलेल्या पापण्याची
गोष्ट ती निराळीच होती
खळखळत्या लाटे सारखी
मधुर अशी तुझी हाक होती
त्या हाकेला साद देणारी
ओढ मनाची पाक होती
स्वैर मनाने गुंतलेली
अशीच तुझी साथ होती
कवटाळुन अश्रूना सजलेली
अशीच माझ्या जीवनाची बाग होती........................
रेश्मा...................

AddThis Social Bookmark Button


माझ ब्लॉगविश्व

 

Design by Amanda @ Blogger Buster