!! " श्री गणेशाय नमः "!!

उंदिरमामा उंदिरमामा......  

Sep 16, 2009

उंदिरमामा उंदिरमामा......नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

मोठे मोठे पोट त्याचे सुपासारखे कान
हाता एवढे लांब नाक तरी दिसते छान
पोटाला गुदगुदी त्याच्या नको करत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

पिवळे पिवळे धोतर त्याच्या पोटावर नाग
मांडीवर चढू नकोस त्याला येईल राग
पायावर उडया सारख्या मारत नको जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

डोक्यावर मुकुट त्यात आहे बघ हीरा
बाप्पा तुला ओरडेल अरे जपून रहा जरा
पाठीमागे त्याच्या नको फिरत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

उंदिरमामा उंदिरमामा......नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
...........अमरीश अ. भिलारे

AddThis Social Bookmark Button


बाप्पा तुझ्या गाडीचे नाव काय....??  

एक आहे शेपूट आणि चार पाय
बाप्पा तुझ्या गाडीचे नाव काय....??
तुरुतुरु चाले दुडूदुडू भागे
नाही तिला पेट्रोल नाही डिझेल
लागे मोदकावर सारखा एक आहे पाय
बाप्पा तुझ्या गाडीचे नाव काय....??
इकडून जमवी फूले तिकडून जमवी फूले
टणाटण मारी उडया हसती सारी मुले
काय म्हणावं तिच्या डोक्यात तरी काय
बाप्पा तुझ्या गाडीचे नाव काय....??
चार आणले दाणे नी एक रुपयाचे नाणे
बसून बघ कोप-यात खाऊ लागली चणे
इतकुशी असून तुझे वजन घेते कशी
काय बाप्पा तुझ्या गाडीचे नाव काय....??
एक आहे शेपूट आणि चार पाय
बाप्पा तुझ्या गाडीचे नाव काय....??
.........अमरीश अ. भिलारे.

AddThis Social Bookmark Button


ए पोट ढोल्या बाप्पा  

ऐकतोस का रे माझं
ए पोट ढोल्या बाप्पा
तुला आहे का वेळ
जरा मारतोस का गप्पा

काय बाबा तुझी
भलतीच आहे मजा
देवून मोदक तुला
सारे करत आहेत पूजा

ताईच्या लाडवावर
ताव मारत बसशील
तिची डिमांड पूर्ण
करायचा विचार करत असशील

अरे माझ्याकडे बघ
जरा मला किती त्रास होतो
रोज होमवर्क करायचा
खूप कंटाळा येतो

काहीतरी कर असं की
नको होमवर्क, मजा मस्त
भाव नको खावूस असा
२ मोदक घेना जास्त

बघ जमलं तर ५ दिवसांत
दाखव चमत्कार तुझा
केलास होमवर्क बंद
तर शेवटच्या दिवशी तुला चीझ पिझ्झा ......
अमरीश अ. भिलारे.

AddThis Social Bookmark Button


मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय  


ते एकमेकांत हरवून जाण
एकमेकांना फुलासारखं जपण
रेशमी बंधांना पुन्हा एकदा विणावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय
तुझी ती गुलाबी पत्र
ती पुनवेची रात्र
सार सार काही पुन्हा अनुभवावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय
तुझा पहिला वहीला स्पर्श
तुला लपवता न आलेला हर्ष
तसंच तू पुन्हा एकदा लाजून दाखवावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय
तुझं लाड लाड मला सार जग बक्षिसं देणं
जोषात येऊन मी तुला चांदणं तोडून देणं
स्वप्नांच्या त्या विश्वात मला पुन्हा जगावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय
तुझं मला वेडू म्हणून हाक मारण
मी चिडलो की तुझं दिलखुलास हसणं
तुझ्यासाठी पुन्हा एकदा वेड व्हावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय
-अनिरुद्ध अभ्यंकर

AddThis Social Bookmark Button


काल चक्र ..!!!  

Jul 22, 2009

पूर नदीला चढतो
तेव्हा मासे फ़िरती नव्या जगातून.
परवश होती किडे मुंगळे
ताव मारती मासे त्यांवर ॥....
---------------------------------
---------------------------------
परंतू जेव्हा पाणी आटे
जमीनीवर तडफ़डती मासे
किडे मुंगळयां मेजवानी रे
काल चक्र हे असेच भासे ॥
*************************
नाती फ़ुलतात पण फ़ुलं नव्हेत
नाती टोचतात पण काटे नव्हेत
कधीतरी भिजवतात नाती कोरडी
जी भिजवत नाहीत कधी ती नातीच नव्हेत.
***************************************
दोन अश्रू निरोपाचे
दोन शब्द समारोपाचे
आंब्या सारखे दरवळती
दोन क्षण सांज भेटीचे !!!
*******************************************
विठ्ठल विटला विटेला
जनांत वोळता जाहला
वारक-यांच्या सोबतीने
गांवोगांव पसरला
*******************************************
वहीतला गुलाब
कध्धी कध्धी फ़ुलत नाही
वळणावरची रजनीगंधा
आजकाल दरवळत नाही.
*******************************************
-सुनिल सामंत

AddThis Social Bookmark Button


प्रेम प्रेम अन् प्रेमच..!!!!!  


गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


कथा एका सागराची !!  

Jul 16, 2009

एकदा काय झालं,एक सरिता रागवली

आपल्या boyfriend ला म्हणाली'

हे रे काय सागर !मीच का म्हणून ?

दर वेळी मीच कामीच का यायचं खाली डोंगरावरून ?

आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी

दरी बघायची नाहीकडा बघायचा नाही

कशी सुसाट पळत येते मी विरहव्याकुळ, संगमोत्सुक

कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन

तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं

कधी सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.

उसळतोस तिच्यासाठी तुझ्यासाठी पाणी आणते मी

पण तुला भरती येते तिच्यासाठी मी नाही जा !

बोलणारच नाही आता येणारही नाही.

काठावरच्या लोकांना सांगून मोट्ठं धरण बांधीन

थांबून राहीन तिथेच.बघच मग.

सरिताच ती बोलल्याप्रमाणे वागली.

सागर बिचारा तडफ़डला आकसला,

आतल्या आत झुरत गेला.

शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा

उठला ताड ओरडला

दहाड उफ़ाळला वारा पिऊन,

लाटांचं तांड्व घेऊन सुटला सुसाट

सरितेच्या दिशेने

लोक येडे.म्हणाले

'सुनामी आली ! सुनामी

कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


" गारवा "  

Jul 13, 2009

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात. !!!!!!!!!!!

कवी : सौमित्र (अल्बम: गारवा)

AddThis Social Bookmark Button


पाणी आणि मन  

Jun 15, 2009



पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही जर गढूळ असतील तर दोघही आयुष्य संपवू शकतात.
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढवतात.
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही स्वछ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
ग्रीष्म परिस्थितीत दोघेही कोरडेच पडतात
पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय?
एकावर बांध घातला तर ते संथ होते, आणि तोच दुसर्‍याला घातला तर ते संत होते.

कवी - अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


Nov 13, 2008


तुझ्याच आठवांमधुनी सखे
काही श्वास तरंगून गेले
घडा रिताच राहीला आयुष्याचा
अन प्राण कलंडून गेले
हात तुझे ते हातांमधले
एकांती स्मरुनीया गेले
रंग हळवे ते शपथांचे
भासात विरुनीया गेले
आधार वाटणारे तुझे ते डोळे
काल स्वप्नात दिसुनीया गेले
दडपलेले दुःख मनातील
शब्दात उतरुनिया गेले


कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......

कशाची आठवण ठेवायचीये
कुठली गोष्ट विसरायचीये
कोणाला मनातलं सांगायचाय
कोणापासुन सगळ लपवायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......

कधी आवाज द्यायचा
कधी निशब्द व्हायचय
कधी रडता रडता हसणं
तर कधी हसता हसता रडणं
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......

कुठे मार्ग बदलायचाय
कुठुन आल्यापावली परतायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......


कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


जीवनाच्या वाटेवर अनेक प्रवासी भेटतात,
काही हात धरतात तर काही धरलेला हात सोडतात

काहींच्या क्षणभर सहवासाने आपली वाट बहरुन येते
आठवणींच गाठोड मात्र आयुष्यभरासाठी मागे ठेउन जाते
मग त्या गाठोडयात आपण आनंदाचे क्षण शोधत राहतो
तो शोधताना हातातील वर्तमान वाळुसारखा निसटुन जातो
एवढ काय असत त्या गाठोडयात? मला कळल नाही
पण त्याला बाजुला सारुन प्रवास करण मलाही जमणार नाही
त्याला ह्रदयाशी धरुन मी माझा प्रवास पुरा करणार
माझ्या बहरुन आलेल्या वाटेला मी आयुष्यभर जपणार


कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


ऑनलाइन  


तुझं सांभाळुन बोलणं
मर्याद्शील वागणं
किति राग आला तरि
मुळिच नाहि तोडणं
तुझि प्रत्येक गोष्ट
मला भुलवत गेलि
अशि तुझि माझि
मैत्रि खास झालि
मग सुरु झाले
वाट बघायचे तास
ऑनलाइन नाहिस म्ह् णुन
डोक्याला त्रास
मग तुझा मेसेज
जरा बिझि आहे मि
पण विसरु नकोस
"यु आर स्पे शल फॉर मि"
आपले वेगळे देश
वेगळ्या आहेत वेळा
"बट आय लाइक यु"
सांगु किति वेळा?
दोन मैत्रिचि कार्डं
त्यात लिहिणं "डिअर"
रडका स्मायलि टाकला
कि म्हणे "आय केअर"
सोडुनच दिलय मिहि
मेसेंजर वर जाणं
पण मिस्ड कॉल येतो का
मोबाइल वर पहाणं
कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


Aug 14, 2008

"काय आवडत तुला माझ्यातल..........??
"तु सारख मला विचारतेस.....मि काहिच बोलत नाहि
म्हणुन मनातल्या मनात हिरमुसतेस
......तुला रुसलेल बघुन मग मी अजूनच तुला चिडवतो
आणि तुझ्या चहेय्राकडे बघुन फ़क्त भुवया उडवतो
..........."तशी ठिक आहेस ग
..........पण सांगण्यासारखं नाहिय काहि
नकट नाक, चिमुकले डोळे आणि रंगाचा तर पत्ताच नाहि.........."
"तरि आवड्तेस तु मला काळजी करू नकोस,
आधिच छोट्या ओठांना आणखिन दाबू नकोस......
"मनभर अस चिड्वूनमी तुझ्याकडे बघितल,
पाठ्मोय्रा तुला हात धरून माझ्याकडे वळवलं........
नजरेला नजर भिडली फ़क्त आणि हसू माझे ओसरले,
भावविभोर तुझ्या डोळ्यांतून झरझर अश्रु ओघळले..........
वेडि आहेस का? म्हणतं मी जवळ तुला घेतल,
तुझे डोळे पुसता पुसता स्वत:लाहि आवरलं............
बोलायच बरच होत पण शब्द्च फ़ूट्त नव्ह्ते
मला बिलगलेली तू माझे काळिज भिजत होते....
पण आज खर सांगू......तू सर्वाथाने जिंकलयस मला लाडके.........
तुझं हळवं मनतुझा गुलाम करतं मला..................लाडके
......... तुझं हळवं मनतुझा गुलाम करतं मला..................

कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


काळे - गोरे..........  

Aug 13, 2008

जेंव्हा आम्ही नुकते जन्मतो
..........................तेव्हा काळे असतो
आणि जेंव्हा वयात येतो
..........................तेव्हा काळे असतो
जेंव्हा आम्ही उन्हात जातो
..........................तेव्हा काळे असतो
आणि जेव्हा थंडीत जातो
..........................तेव्हा काळे असतो
जेंव्हा आम्ही हिंस्त्र बनतो
.......................... तेव्हा काळे असतो
कधी आम्ही खूप घाबरतो
.......................... तेव्हा काळे असतो
जेव्हा आम्ही आजारी पडतो
.......................... तेव्हा काळे असतो
सरते शेवटी,जेव्हा केव्हा मरण पावतो
.......................तेव्हाही काळेच असतो
आणि तुम्ही गोरे लोक,
जेंव्हा नुकतेच जन्मता,
................तेव्हा गोड गुलाबी असता
जेंव्हा केंव्हा वयात येता,
.................तेव्हा सफ़ेद गोरे दिसता
जेंव्हा उन्हात जाता,
...............तेव्हा लालभडक दिसता
आणि थंडीत जाता,
.................तेव्हा निळसर भासता
जेंव्हा हिंस्त्र बनता,
………….......तेंव्हा जांभळे दिसता
कधी खुप घाबरता
..............तेव्हा पिवळसर दिसता
जेंव्हा आजारी पडता,
................तेव्हा हिरवेगार दिसता
कण्हता आणि मरण पावता,
....................तेव्हा राखाडी बनता
असे रंगीबेरंगी लोक, तुम्ही !
आम्हाला.. आम्हाला….या काळ्यांना 'कलर्ड' म्हणता?

कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


माझ ब्लॉगविश्व

 

Design by Amanda @ Blogger Buster