!! " श्री गणेशाय नमः "!!

!! आयुष्य !!  

Nov 24, 2009

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे
मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ

एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु

सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जगा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल

एक एक धागा आशेचा, सुखाचा
आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती

तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती
मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा

धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी

एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा
आणि अस्तित्वाचा आयुष्याला
त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला
सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते


तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने
मन मात्र खिन्न होते

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख

मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचाहे
चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे

अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही

महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत..........

कवी : अज्ञात

AddThis Social Bookmark Button


खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???  

कशाला गं आईनं असं मला माललं..

ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..

खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..

टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..

माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..

त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..

सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..

खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??


बाबांचा पांधला पांधला रूमाल मला

मिलालात्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..

त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..

सांग आता यात माझं असं काय चुकलं..??

रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला.

.दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..

कलतंच नाही मला नेमकं काय झालं.

खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??

कवी : अज्ञात

AddThis Social Bookmark Button


बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
....................तो बाप असतो
सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
..................................तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
................................तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...................................तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,
तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
....................................तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल
तर खूप चिडतो"सगळ नीट पाहिलं का?"
म्हणून खूप ओरडतो"बाबा तुम्हाला काही समजत का?
"अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.
कवी : अज्ञात

AddThis Social Bookmark Button


दप्तर - एक कविता  


अडगळीच्या खोलीमधलं, दप्तर आजही जेव्हा दिसतं
मन पुन्हा तरूण होऊन,बाकांवरती जाऊन बसतं
प्रार्थनेचा शब्द अन शब्द ,माझ्या कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला ,मग आठवणींचा मेळा जमतो
या सगळ्यात लाल खुणांनी.गच्च भरलेली माझी वही
अपूर्णचा शेरा आणि ,बाई तुमची शिल्लक सही
रोजच्या अगदी त्याच चुका,आणि हातांवरले व्रण
वहीत घट्ट मिटून घेतलेत,आयुष्यातले कोवळे क्षण
पण या सगळ्या शिदोरीवरंच ,बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं,स्वतःलाच रागवून बघतो
इवल्याश्या या रोपट्याची,तुम्ही इतकी वाढ केली आहे
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा,सवय आता गेली आहे
चांगलं अक्षर आल्याशिवाय,माझा हात लिहू देत नाही
एका ओळीत सातवा शब्द,आता ठरवून सुद्धा येत नाही
दोन बोटं संस्कारांचा,समास तेवढा सोडतो आहे
फळ्यावरच्या सुविचारासारखी,रोज माणसं जोडतो आहे
योग्य तिथे रेघ मारून,प्रत्येक मर्यादा ठरवलेली
हळव्या क्षणांची काही पानं,ठळक अक्षरात गिरवलेली
तारखेसह पूर्ण आहे वही ,फक्त एकदा पाहून जा
दहा पैकी दहा मार्क ,आणि सही तेवढी देऊन जा
कवी : अज्ञात

AddThis Social Bookmark Button


माझ ब्लॉगविश्व

 

Design by Amanda @ Blogger Buster